मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याची १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. वरळीच्या अपघातात कावेरी नाखवा यांचा कारसोबत फरफटत गेल्यामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. राज्यातल्या सर्व हिट अँड रन प्रकरणातील दोषींवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील सर्व बेकायदा बांधकामांवर नियमानुसार कारवाई करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पब आणि बारचे बेकायदा बांधकाम पाडून टाकावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.