श्रीनगर : देशभरात आता थंडी वाढू लागली आहे. त्याची सुरुवात काश्मिरातून झाली आहे. काश्मीरमध्ये तीन दिवसांच्या बर्फवृष्टीनंतर पारा प्रथमच शून्य अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. शोपियानमध्ये पारा उणे ३.९ अंश सेल्सिअसवर आला आहे. हा देशातील सर्वात थंड जिल्हा ठरला. जम्मू-काश्मीरसह पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पारा घसरला आहे. श्रीनगर येथे पारा ०.७ अंश सेल्सिअसवर होता. काझीगुंड येथे -१.६, कुपवाडा येथे -०.८, गुलमर्ग येथे -०.६, कोकरनाग येथे १.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले. तर राजस्थानमध्ये सीकर येथे सर्वांत कमी ७.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले. इतर राज्यांमध्येही पारा घसरत आहे.