Sunday, June 30, 2024 08:56:19 AM

Rahul Gandhi
राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या तयारीत आहे.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार

नवी दिल्ली : देशात अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले. सभागृहात काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी ही विरोधात असलेली सर्वात मोठी आघाडी असेल. यामुळे विरोधी पक्षनेता निवडण्याची संधी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या तयारीत आहे. ही निवड झाली तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्षनेते राहुल गांधी असा राजकीय सामना वारंवार होताना दिसेल. 

नरेंद्र मोदी रालोआचे नेते

रालोआने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेळ मागितली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

१ मोदींनी मागितली राष्ट्रपतींची वेळ 
२ रालोआच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड 
३ मोदी काळजीवाहू पंतप्रधान
४ नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा - ५ जून २०२४
५ लोकसभा निवडणूक निकाल जाहीर - ४ जून २०२४


सम्बन्धित सामग्री