Tuesday, September 17, 2024 01:07:25 AM

Ajit Pawar
अजित पवार महायुतीत राहणार ?

जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे महायुतीत नवनव्या वादाला तोंड फुटतंय....

अजित पवार महायुतीत राहणार

मुंबई : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे महायुतीत नवनव्या वादाला तोंड फुटतंय.... भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महायुती सरकामध्ये नक्की चालंलय तरी काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये....नुकतंच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसंदर्भात केलेलं वक्तव्य....त्याआधी सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य यामुळे महायुतीतला वाद समोर येतोय....आधीच लोकसभेत महायुतीला फटका अजित पवारांच्या महायुतीत सामिल झाल्यामुळे बसला अशी विधानं राष्ट्रवादीसंदर्भात होत असताना आता अजित पवार विधानसभेपूर्वीच वेगळा मार्ग निवडणार अशी शक्यता वर्तवली जातेय.....

डॉ. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे.  असे असताना त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. धाराशिवमधील पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपले कधीही पटले नाही. त्यांचे आणि आपले कधीही पटू शकत नाही. तिच एक कडवट शिवसैनिक म्हणून आपली भावना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला सतत आपण विरोध करत आलो आहोत; असे तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचे वृत्त आहे. अजित पवारांनी त्यांची नाराजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर घातली असल्याचेही वृत्त आहे. याआधी सदाभाऊ खोत यांनीही अजित पवारांसोबत जमत नाही असं विधान केलं होतं. जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही आठवड्यांपूर्वी शिवसेनेच्या रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे खापर थेट अजित पवारांवरच फोडले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत असूनही अजित पवार निवडक मुद्यांवर वेगळी भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीत राहून अजित पवार महायुतीपेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसले आहे...याचेच ताजे उदाहरण म्हणजे शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका....सरकारमध्ये असूनही शिवरायांच्या पुतळ्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं.....स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आणि दुसऱ्याच दिवशी शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं.... मुंबईतल्या चेंबूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मूक आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आलं. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा हार अर्पण करुन, काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं. तर परभणीतही आत्मक्लेश आंदोलन झालं.

अजित पवारांची माफी

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी भूमिका पाहिली तर, पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ तारखेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी ट्विट करत घाईघाईत पुतळा बनवल्याचं म्हणत अक्षम्य चूक म्हटलं. यानंतर २८ तारखेला स्वत: अजित पवारांनीच तेरा कोटी जनतेची माफी मागितली, सरकारकडून माफी मागणारे अजित पवार पहिले आहेत. अजित दादांनी माफी मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीनं सत्तेत असतानाही राज्यभर आंदोलनं केली. सरकारकडून अजित पवारांनी माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आपल्याला शंभर वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, असं म्हटलंय.

वादाचे मुख्य कारण

सध्या महायुतीत ज्या जागेवर जे आमदार आहेत. त्यांना त्याच जागा दिल्या जाव्यात असा महायुतीतील नेत्यांचा सूर आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांचे भविष्य टांगणीला लागलंय....सध्या अजित पवारांसोबत ४१ आमदार महायुतीती सामिल झालेत...या ४१ आमदारांपैकी २० आमदार भाजप उमेदवारांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले तर ८ आमदारांनी शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेतील उमेदवारांना पराभूत करून विधानसभा गाठली...इतकच नाही तर सध्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत ....अजित पवारांसह ९ पैकी ७ मंत्र्यांचा गेल्या विधानसभेत भाजपाशी सामना झाला होता...त्यामुळे आता कुठल्या कुठल्या जागेवर भाजपाला संघर्ष करावा लागेल पाहुयात....

इंदापूर 
राष्ट्रवादी / भाजप 
दत्तात्रय भरणे / हर्षवर्षण पाटील 
---------------------
वडगाव शेरी
राष्ट्रवादी / भाजप 
सुनील टिंगरे / जगदीश मुळीक 
----------------------
मावळ
राष्ट्रवादी / भाजप 
सुनील शेळके / बाळा भेगडे 
---------------------
पुसद
राष्ट्रवादी / भाजप 
मनोहर नाईक / निलय नाईक 
---------------------
अहेरी
राष्ट्रवादी / भाजप 
धर्मरावबाबा आत्राम / अंब्रीशराजे अत्राम 
---------------------
कोपरगाव
राष्ट्रवादी / भाजप 
आशुतोष काळे / स्नेहलता कोल्हे 
---------------------
अहमदपूर 
राष्ट्रवादी / भाजप 
बाळासाहेब पाटील  / विनायकराव जाधव पाटील  
---------------------
अकोले
राष्ट्रवादी / भाजप 
डॉ. किरण लहामटे / वैभव पिचड 
---------------------
उदगीर
राष्ट्रवादी / भाजप 
संजय बनसोडे / अनिल कांबळे 
---------------------
फलटण 
राष्ट्रवादी / भाजप 
दीपक चव्हाण / रोहितदास आगवणे 
---------------------
कागल
राष्ट्रवादी / भाजप 
हसन मुश्रीफ / समरजीत घाटगे (अपक्ष, भाजप पुरस्कृत)
---------------------
हडपसर
राष्ट्रवादी / भाजप 
चेतन तुपे / योगेश टिळेकर 
---------------------
अमळनेर
राष्ट्रवादी / भाजप 
अनिल भाईदास पाटील / शिरीष चौधरी 
---------------------
तुमसर
राष्ट्रवादी / भाजप 
राजू कारेमोरे / प्रदीप पडोळे 
---------------------
वाई
राष्ट्रवादी / भाजप 
मकरंद पाटील  / मदन भोसले 
---------------------
आष्टी
राष्ट्रवादी / भाजप 
भाऊसाहेब आजबे / भीमराव आनंदराव धोंडे
 ---------------------
अर्जुनी मोरगाव
राष्ट्रवादी / भाजप 
मनोहर चंद्रिकापुरे / राजकुमार बडोले 
---------------------
माजलगाव
राष्ट्रवादी / भाजप 
प्रकाश सोळंके / रमेश कोकाटे

समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. समरजीत घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू  ठोकतील.

समरजीत घाटगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक 
विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत
राष्ट्रवादीकडून मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात 
समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. 
तेव्हापासून घाटगेंची भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी 
मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी
महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता 
मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाटगे नाराज 
मविआचे संभाव्य उमेदवार संजय घाटगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा

महायुतीत राष्ट्रवादीची तिरकी चाल
महायुतीत राहून महायुतीच्या नेत्याला विरोध

महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेते. 
अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिका नकोय. 
लोकसभेत झालेल्या नुकसानामुळे महायुतीत अस्वस्थता आहे. 
मुसलमान सोबत न आल्यास अजित पवारांसाठी आव्हानात्मक स्थिती असेल.. 
महायुतीच्या पलीकडे काही करता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादीने केल्याचे समजते. 

महायुतीसमोर असलेली आव्हाने 

महायुतीतला जागावाटपाचा प्रश्न लवकर निकाली काढणे.

शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणे.

घटकपक्षांविरोधात बोलणे टाळणे.

महायुतीत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे.

उमेदवार जिंकण्यासाठी सर्व सहकारी पक्षांनी मदत करणे.

              

सम्बन्धित सामग्री