मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटवाटप सुरू झाले आणि प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीला उधाण आले. महायुतीत २७ जणांनी तर मविआत ४७ जणांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील ६३ विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. प्रमुख पक्ष तसेच इतर पक्ष यांचे मिळून जवळपास ८० मोठे बंडखोर निवडणूक रिंगणात आहेत. या बंडोखोरीचा फटका कोणाला बसेल आणि फायदा कोणाला होईल यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याआधी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. या बंडखोरीमुळे सत्ताधारी काँग्रेसला फटका बसला होता. विरोधात असलेल्या शिवसेना - भाजपा युतीला पहिल्यांदाच राज्यात सत्तेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बंडखोरीचा फायदा होणार की तोटा याकडे अनेकांचे लक्ष आहे. विधानसभेतील एकूण जागा २८८ आहेत. बहुमताचा आकडा १४४ आहे. बंडखोरांमुळे त्रिशंकू स्थिती झाली तर बहुमतासाठी आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक विभागनिहाय बंडखोर
मुंबई - मतदारसंघ - ०८, बंडखोर - १०
कोकण - मतदारसंघ - ०८, बंडखोर - ०९
उत्तर महाराष्ट्र - मतदारसंघ - ०३, बंडखोर - ०३
पश्चिम महाराष्ट्र - मतदारसंघ - ३१, बंडखोर - ४५
विदर्भ - मतदारसंघ - ०८, बंडखोर - ०८
मराठवाडा - मतदारसंघ - ०५, बंडखोर - ०५
लिंगनिहाय बंडखोर
एकूण बंडखोर - ८०
महिला - ९
पुरुष - ७१
पक्षनिहाय बंडखोर
एकूण बंडखोर - ८०
भाजपा - १४
शिंदेची शिवसेना - ०६
राष्ट्रवादी - ०३
काँग्रेस - २०
पवारांची राष्ट्रवादी - १२
ठाकरेंची शिवसेना - ११
इतर - १४
धर्मनिहाय बंडखोर -
एकूण बंडखोर - ८०
हिंदू - ७५
मुसलमान - ०५
प्रभावी बंडखोर
समीर भुजबळ
समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे
समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
समीर भुजबळ नाशिकचे माजी खासदार
महात्मा फुले समता परिषदेचंही काम करत सामाजिक कार्यात सक्रिय
नांदगाव मतदारसंघात बंडखोरी करत विधानसभेच्या रिंगणात
हीना गावित
हीना गावित विजयकुमार गावित यांच्या कन्या
हीना गावित २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
त्यावेळी हीना गावित अवघ्या २६ वर्षांच्या होत्या.
पेशाने डॉक्टर असणाऱ्या गावित या लोकसभेतील तरुण खासदार होत्या.
लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये दुसऱ्यांदा विजय
लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये लोकसभेत पराभव
अक्रानी- अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात
गोपाळ शेट्टी
शेट्टी हे जवळपास तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय
शेट्टी यांनी १९९२ मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक लढवली
तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी
मुंबईच्या उपमहापौरपदाचीही जबाबदारी पार पाडली
बोरिवली मतदारसंघातून २००४ मध्ये भाजपा पक्षातून विधानसभा विजयी
विधानसभा २००९ मध्ये पुन्हा आमदार
भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये विजयी
लोकसभेत २०१९ मध्ये दुसऱ्यांदा विजय
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात
विधानसभा २०२४ निवडणुकीत १५० बंडखोर
सगळ्यात जास्त बंडखोर पश्चिम महाराष्ट्रात
बंडखोरांचं पक्षाच्या उमेदवारांसमोर किती आव्हान ?
बंडखोरी होण्याची काय आहेत कारणे ?
निकालानंतर १९९५ ची परिस्थिती होणार का ?
बंडखोर रिंगणात राहणार की, माघार घेणार ?
महाराष्ट्र विधानसभा एकूण जागा २८८
विधानसभेतील बहुमताचा आकडा १४४
बंडखोरांमुळे त्रिशंकू स्थिती झाली तर बहुमतासाठी आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता
अनेक राजकीय विश्लेषक २०२४ विधानसभा निवडणुकीत १९९५ सारखी स्थिती होईल असं भाकित करत आहेत... बंडखोर उमेदवार निकाल फिरवतील अशी शक्यता वर्तवत आहेत... काय होती १९९५ ची स्थिती चला पाहुयात...
विधानसभा १९९५
काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अशी मुख्य लढत
या प्रमुख पक्षांसहीत एकूण ३६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात
विधानसभा निवडणूक १९९५ मध्ये ३१९६ अपक्ष उमेदवार रिंगणात
काँग्रेसने २८८ पैकी २८६ जागा लढवल्या
युतीमधील शिवसेनेनं १६९ जागा लढवल्या
भाजपाने ११६ जागा लढवल्या
काँग्रेसने निवडणुकीमध्ये ८० जागा जिंकल्या.
शिवसेनेनं ७३ जागांवर बाजी मारली
भाजपाने ६५ जागी विजय मिळवला.
अपक्ष ४५ उमेदवार विजयी
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतके अपक्ष उमेदवार विजयी
विधानसभा २०२४ मध्ये तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता
बंडखोरीची प्रमुख कारणे
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका रखडल्यात
स्थानिक स्तरावरील नेतृत्वाला कुठेच संधी मिळालेली नाही.
लोकसभेला मतदारसंघाचा आवाका मोठा असल्याने अनेकांनी बंडखोरी टाळली
लोकसभेला बंडखोरी करण्याचा अनेकांनी मोह टाळला
पक्षफुटीनंतर नेत्यांना अनेक पर्याय उपलब्ध, त्यामुळे पक्षांतर मोठ्या प्रमाणात
स्थानिक नेतृत्व आणि वर्षानूवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे कारण बंडखोरीला कारणीभूत
आपले अधिक आमदार निवडून येण्यासाठी मित्रपक्षाच्या विरोधात छुप्या पद्धतीने उमेदवार देणे.
अपक्ष आमदाराला छुपा पाठिंबा देऊन आपला उमेदवार निवडूण आणणे.
सगळ्याच राजकीय पक्षांचं छुप्या पद्धतीने हे काम सुरू असल्याचं राजकीय अभ्यासकांचे मत
मविआ, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित मैदानात त्यामुळे बंडखोरांना विजयाची अपेक्षा