मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वच जण वाट पाहताय ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अनेक आमदार आपापल्या पक्ष प्रमुखांची भेट घेताय.
त्यातच आता भाजपा आणि शिवसेनेच्या संभाव्य मंत्रीची नावे हाती आली आहेत. भाजपा आणि शिवसेना दोन्हही पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कोण आहेत भाजपाचे संभाव्य मंत्री?
नितेश राणे, संजय कुटे, आशीष शेलार, योगेश सागर, राहुल अहीर, राहुल कुल, सचिन कल्याणशेट्टी, समीर कुनवार, रवी राणा यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री?
उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भूसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, भरत गोगावले, राजेश शिरसागर, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, मंगेश कुडाळकर, प्रकाश आबिटकर यांची नावे संभाव्य मंत्री म्हणून समोर आली आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचे देखील समोर आले होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे दीपक केसरकर आणि तानाजी सावंत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल पाच तास वेटिंगला ठेवलं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता संभाव्य मंत्र्यांपैकी पण नक्की कुणाची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.