कोल्हापूर : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी वडिलांमुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी गेली अशी जाहीर कबुली दिली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रिंगणात उतरण्याची तयारी करत असलेल्या संभाजीराजेंना अगदी आयत्यावेळी माघार घ्यावी लागली होती. संभाजीराजेंचे वडील कोल्हापूरचे शाहू दुसरे अर्थात शाहू छत्रपती महाराज यांनी काँग्रेसच्या तकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत शाहू छत्रपती महाराज यांचा विजय झाला. पण संभाजीराजेंचे दुःख कमी झाले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्यामुळे पक्ष स्थापन करणाऱ्या संभाजीराजेंनी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुःखाचे कारण जाहीर केले.
लोकसभेआधी कोल्हापुरात काय घडलं आणि संभाजीराजेंचा काटा कुणी काढला ते पाहुयात,
- संभाजीराजे उमेदवारीसाठी चाचपणी करत होते.
- काँग्रेससोबत संभाजीराजे यांची प्राथमिक चर्चाही झाली होती.
- काँग्रेस राजेंना उमदेवार करणार हे समजताच शरद पवार सक्रिय झाले.
- शरद पवारांना काहीही करून संभाजीराजेंना रोखायचे होते.
- संभाजीराजे भाजपाकडून राज्यसभेवर गेल्यापासून पवार नाराज होते.
- काँग्रेसकडून संभाजीराजे खासदार झाले तर पवारांच्या मराठा नेतृत्वाला आव्हान ठरणार होते.
- संभाजीराजे खासदार झाल्यास वरचढ होण्याची पवारांना भीती होती.
- शरद पवारांनी शाहू महाराजांचे नाव पुढे करून संभाजीराजेंना अटकाव केला.
- वडीलच सक्रिय झाल्याने संभाजीराजे यांचा नाईलाज झाला.
- नाराज संभाजीराजेंनी बराच प्रयत्न केला. पण, वडील बधले नाहीत.
- नाराज संभाजीराजेंनी अखेरीस मौन बाळगणे पसंत केले.
- शाहूंना पुढे करत शरद पवारांनी संभाजीराजेंचा काटा काढला.