Wednesday, March 05, 2025 06:23:14 PM

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोण नाराज?

महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी एकूण 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 अश्या एकूण 39 मंत्र्यांनी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोण नाराज

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी एकूण 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 अश्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी नंतर काहींच्या चेहऱ्यावर आनंद खुलला तर काहींमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे अनेक आमदार रात्री उशिरापर्यंत पक्ष प्रमुखांची भेट घेत होते. परंतु तरी देखील त्यांची वर्णी मंत्रीपदी न लागल्याने अनेकांमध्ये नाराजी आहेत. कोण आहेत ते नाराज आमदार पाहुयात: 

भाजपातून कोणाला डावललं ? 
महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे एकूण 19 आमदार आहेत. परंतु मंत्रिपदासाठी भाजपचे विजय कुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण हे देखील इच्छुक होते. मात्र त्यांना डावललं असल्याने नाराजी दिसून येतंय. 

शिवसेनेकडून कोणाला डावललं ? 
शिवसेनेच्या एकूण 11 आमदारांनी शपथ घेतली. यात तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादीकडून कोणाला डावललं ? 
दरम्यान राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शपथ घेतली असून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे यांना डावललं असल्याचं समोर आलं आहे. 


 


सम्बन्धित सामग्री