मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्डधारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.