मुंबई : यंदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार आहे. नेहमीप्रमाणे नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. राजकीय पक्षांकडूनही दिवाळी निमित्त नागरिकांना उटणे, भेटवस्तू आदींचे वाटप करुन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन आनंद द्विगुणीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून यंदा दिवाळीत कोणत्या दिवशी कोणता सण आहे ?
- वसुबारस : सोमवार २८ ऑक्टोबर २०२४रोजी वसुबारस हा सण साजरा केला जाईल. या निमित्ताने गायीची पूजा केली जाईल. गायीला गोडधोड खाऊ घातले जाईल.
- धनत्रयोदशी : मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जाईल. या निमित्ताने घरोघरी आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाईल. सजावट केली जाईल. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली जाईल. पणत्या प्रज्वलित केल्या जातील. धनत्रयोदशीनिमित्त देवांचे डॉक्टर आयुर्वेदाचार्य धन्वंतरी यांची पूजा केली जाईल.
- भाकड दिवस : बुधवार ३० ऑक्टोबर २०२४ हा भाकड दिवस आहे. या दिवशी कोणताही सण नाही.
- नरकचतुर्दशी : गुरुवार ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नरकचतुर्दशी हा सण साजरा केला जाईल. या निमित्ताने अभ्यंगस्नान करुन आणि फटाके फोडून सण साजरा केला जाईस. घरोघरी आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाईल. सजावट केली जाईल. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली जाईल. पणत्या प्रज्वलित केल्या जातील. काही ठिकाणी नरकचतुर्दशीनिमित्त श्रीकृष्ण पूजन करण्याचीही पद्धत आहे. सहकुटुंब फराळ करुन आणि शेजाऱ्यांना तसेच ओळखीतल्यांना फराळाचे वाटप करुन दिवाळी साजरी केली जाईल.
- लक्ष्मी पूजन : शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मी पूजन हा सण साजरा केला जाईल. घरोघरी आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाईल. सजावट केली जाईल. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली जाईल. पणत्या प्रज्वलित केल्या जातील. संध्याकाळी ०५.३५ ते रात्री ०८.०६ दरम्यान लक्ष्मीची पूजा केली जाईल.
- बलिप्रतिपदा / दीपावली पाडवा : शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी बलिप्रतिपदा आणि दिवाळीतला पाडवा हे दोन सण साजरे केल जातील. या निमित्ताने अभ्यंगस्नान करुन आणि फटाके फोडून सण साजरा केला जाईस. घरोघरी आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाईल. सजावट केली जाईल. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली जाईल. पणत्या प्रज्वलित केल्या जातील. या दिवशी पाडव्यानिमित्त पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे.
- भाऊबीज : रविवार ३ नोव्हेंबर २०२४ रोजी भाऊबीज हा सण साजरा केला जाईल. या निमित्ताने अभ्यंगस्नान करुन आणि फटाके फोडून सण साजरा केला जाईस. घरोघरी आकाशकंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाईल. सजावट केली जाईल. प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली जाईल. पणत्या प्रज्वलित केल्या जातील. या दिवशी भाऊबीजेनिमित्त बहिणीने भावाला ओवाळण्याची पद्धत आहे.