Thursday, April 17, 2025 05:54:15 PM

कोणत्या 8 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही?

मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचा पदभार स्विकारलेला नाही.

कोणत्या 8 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप करण्यात आलं होतं. खातेवाटप होऊन अनेक दिवस उलटले. तरीही अद्याप मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचा पदभार स्विकारलेला नाही. याबाबत राजकीय चर्चा होत असली तरी त्याबाबत संबंधित पक्ष वा मंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

पदभार न स्वीकारणारे मंत्री

खातेवाटप होऊनही बऱ्याच मंत्र्यांनी पदाचा कार्यभार स्विकारला नाही. भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे दुग्धविकास खाते आहे. परंतु त्यांनी अद्याप त्यांच्या पदाचा कार्यभार स्विकारला नाही. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खाते आहे. त्यांनी अजून त्यांच्या खात्याचा कार्यभार स्विकारला नाही. शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी देखील रोजगार हमी खात्याचा कार्यभार स्विकारला नाही.

 

हेही वाचा : आता लक्ष्य सुदर्शन घुले; बीडमध्ये सीआयडी अॅक्शन मोडवर

प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याचा पदभार स्विकारला नाही. तसेच दत्ता भरणे यांनीही क्रीडा आणि अल्पसंख्यांक खात्याचा कार्यभार स्विकारला नाही.

 नागपूरात 33  मंत्र्यांसह 6 राज्यमंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनात खातेवाटप जाहीर झाले. माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय (राज्यमंत्री) खाते मिळाले. मात्र अद्याप त्यांनी त्या खात्याचा पदभार स्विकारला नाही. योगेश कदम यांच्यावर गृह  (राज्यमंत्री) खात्याची जबाबदारी आहे. तरी त्यांनी अजून कार्यभार स्विकारला नाही. आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याचे राज्यमंत्रीपद आहे पण त्यांनी अजूनही पदभार स्विकारला नाही.

खातेवाटप होऊनही मंत्र्यांची अनास्था असल्याचे दिसत आहे. खात्याबाबत नाराजी असल्याचे चित्र आहे. पक्षाकडून पदभार स्वीकारण्याचे निर्देश मंत्र्यांना देण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री