Tuesday, December 03, 2024 10:56:21 PM

Bangladesh
बांगलादेशप्रश्नी भारताकडे लक्ष

बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे बांगलादेशचा शेजारी देश असलेला भारत काय करणार याकडे जगाचे लक्ष आहे.

बांगलादेशप्रश्नी भारताकडे लक्ष

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे बांगलादेशचा शेजारी देश असलेला भारत काय करणार याकडे जगाचे लक्ष आहे. 

भारतात सर्वपक्षीय बैठक

शेख हसीना भारतात सुरक्षित ठिकाणी आहेत. बांगलादेशमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना बांगलादेशमधील परिस्थितीची माहिती दिली. तसेच भारत सरकारची बांगलादेश प्रकरणातील सध्याची भूमिका समजावून सांगितली. 

बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकार

बांगलादेशात दंगली सुरू झाल्यानंतर शेख हसीना यांनी ढाका सोडून भारतात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. देश सोडणाऱ्या शेख हसीनांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. हसीनांनी राजीनामा दिला तरी अद्याप बांगलादेशमध्ये नवे सरकार स्थापन झालेले नाही. बांगलादेशच्या लष्कराने राष्ट्रपतींशी चर्चा केली. यानंतर राष्ट्रपतींनी देशात काळजीवाहू सरकार स्थापन करण्याचे निर्देश लष्करी अधिकाऱ्यांना तसेच सर्व पक्षीय नेत्यांना दिले आहेत. लवकरच बांगलादेशमध्ये संसद विसर्जित केली जाईल. यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन केले जाईल; असे समजते. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo