मुंबई : पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गाच्या उभारणीचं काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या सोमवारी ताशी वीस किमी वेगाने धावत आहेत. पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने गाड्यांचा वेग ताशी ४५ किमी. पर्यंत वाढवला जाईल. येणाऱ्या - जाणाऱ्या धीम्या गाड्यांसाठी सहाव्या मार्गिकेचं काम झालं आहे. लवकरच येणाऱ्या - जाणाऱ्या जलद गाड्यांसाठी सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण केलं जाईल.