Saturday, October 05, 2024 04:03:43 PM

Ajit Pawar
'शक्ती पेटीतील तक्रारींची दखल घेऊ'

शक्ती पेटीतील तक्रारींची दखल घेऊ. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. तक्रारीआधारे तपास केला जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. - अजित पवार

शक्ती पेटीतील तक्रारींची दखल घेऊ

बारामती : शक्ती पेटीतील तक्रारींची दखल घेऊ. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. तक्रारीआधारे तपास केला जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते. मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरू आहे. महायुती सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन्ही योजनांचा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांतून प्रचार सुरू केला. या पार्श्वभूमीवर शक्ती पेटीतील तक्रारींविषयी बोलताना अजित पवारांनी तातडीने दखल घेऊ असे जाहीर केले. 


सम्बन्धित सामग्री