Friday, June 21, 2024 11:40:15 AM

Devendra Fadnavis
'हक्काचं सोडायचं नाही, मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं'

हक्काचं सोडायचं नाही, मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं, असे भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत घेतलेल्या संकल्प सभेत बोलत होते.

हक्काचं सोडायचं नाही मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं

मुंबई : हक्काचं सोडायचं नाही, मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं, असे भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत घेतलेल्या संकल्प सभेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोट्या प्रचाराचा फटका बसला. या प्रचाराला हरविण्यासाठी आणि भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. 

मविआचा प्रचार पुन्हा चालणार नाही. मुंबईत भाजपा खोलवर रुजली आहे. अहंकार टाळा, चमकेशगिरी सोडा; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची वक्तव्यं

  1. मविआचा प्रचार पुन्हा चालणार नाही - फडणवीस
  2. मुंबईत भाजपा खोलवर रुजली आहे - फडणवीस
  3. पराभवाने अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर - फडणवीस
  4. अहंकार टाळा, चमकेशगिरी सोडा - फडणवीस
  5. हक्काचं सोडायचं नाही, मित्रपक्षांना द्यायचं ते दिलं - फडणवीस

भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री