Monday, July 01, 2024 02:47:47 AM

Water became expensive in Chhatrapati Sambhajinag
छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी महागले

ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी महागले

प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे सध्या टँकरची मागणी वाढली आहे. आतापर्यंत पाचशे रुपयांना मिळणाऱ्या २०० हजार लिटरच्या टैंकरसाठी ७००, तर ५००० लिटरच्या टँकरसाठी आता १२०० रुपये मोजावे लागत आहेत. मनपाकडून नो नेटवर्किंग झोनमध्ये १०० टँकर सुरू आहेत, तर सुमारे ५०० वर खासगी टँकरही पाणी विक्री करत आहेत. शहरात ८ ते१०  दिवसांआड होणाऱ्या पुरवठ्यातील गॅप २ ते ३ दिवसांनी वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.


सम्बन्धित सामग्री