Monday, July 01, 2024 04:26:01 AM

Tukaram Maharaj
तुकोबा इनामदार वाड्यात विसावले

आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.

तुकोबा इनामदार वाड्यात विसावले

देहू : आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे यंदाचे ३३९ वे वर्ष आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार २८ जून रोजी देहू येथून झाले. पालखीचा रात्री देहूच्याच इनामदार वाड्यात विसावा आहे. ही पालखी शनिवार २९ जून रोजी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल, इथे पालखीचा पहिला मुक्काम असेल. पालखी रविवार ३० जून रोजी पिंपरी कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल. यानंतर १ जून पर्यंत तुकोबाच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंग विठ्ठल मंदिरात राहील. नंतर २ जुलै रोजी पालखी पुण्याहून लोणी काळभोर मार्गे कदम चाक वस्ती येथे मुक्कामाला थांबेल. यानंतर ३ जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी असेल. 

गुरुवार ४ जुलै रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात तर ५ जुलै रोजी उंडवडी येथे पालखीचा मुक्काम राहील. यानंतर ६ जुलै रोजी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम असेल. नंतर ८ जुलै रोजी सणसर बेलवाडी येथे मुक्काम राहील. यानंतर ९ जुलै रोजी रात्री अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाला थांबेल. नंतर १० जुलै रोजी निमगाव केतकी येथे पालखीचा मुक्काम राहील. यानंतर १२ जुलै रोजी सकाळी सराटी येथे निरा स्नान करून पालखी अकलूजकडे रवाना होईल. पालखी १३ जुलै रोजी माळीनगर मार्गे जाईल आणि बोरगाव येथे मुक्कामाला राहील. यानंतर पालखी १४ जुलै रोजी तोंडले बोंडाळे मार्गे पिराची कुरोली येथे मुक्कामास जाईल. नंतर पालखी १६ जुलै रोजी वाखरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण ८ जुलैला बेलवाडी, १० जुलैला इंदापूर, १२ जुलैला अकलूज, माने विद्यालय मध्ये होणार आहे. तर उभे रिंगण १३ जुलैला माळीनगर, १५ जुलैला बाजीराव विहीर, १६ जुलैला पंढरपूर येथे होणार आहे.


सम्बन्धित सामग्री