Wednesday, October 02, 2024 12:51:32 PM

Waqf Bill 2024
वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ सादर केले. हे विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.

वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे

नवी दिल्ली : मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ सादर केले. हे विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. याआधी विधेयक सादर होताच विरोधकांनी तीव्र विरोध सुरू केला. समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला. चर्चेअंती केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर देताना विरोधकांच्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. वक्फच्या संपत्ती आणि उत्पन्नात मोठी तफावत असल्याचे कायदामंत्री म्हणाले. वक्फ बोर्ड राज्यघटनेपेक्षा मोठे झाले का ? वक्फच्या तरतुदी कायद्यापेक्षा श्रेष्ठ कशा ? सर्व मुसलमानांचे वक्फवर प्रतिनिधित्व का नसावे ? असे प्रश्न कायदामंत्र्यांनी उपस्थित केले. दाऊदचा प्रभाव टिकवायला वक्फचा हातभार लागल्याचेही कायदामंत्री म्हणाले. कायदामंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर लोकसभेने विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवले.

वक्फ सुधारणा विधेयक २०२४
वक्फ सुधारणा चर्चेत अडकल्या
मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे 

दाऊदचा प्रभाव टिकवायला वक्फचा हातभार - रिजिजू
वक्फ बोर्ड राज्यघटनेपेक्षा मोठे झाले का ? - रिजिजू
वक्फच्या तरतुदी कायद्यापेक्षा श्रेष्ठ कशा ? - रिजिजू
सर्व मुसलमानांचे वक्फवर प्रतिनिधित्व का नसावे ? - रिजिजू
वक्फच्या संपत्ती आणि उत्पन्नात मोठी तफावत - रिजिजू
सच्चर समितीनेही वक्फ सुधारणा सुचवली - रिजिजू
आजचे वक्फ बोर्ड मूठभरांच्या ताब्यात - रिजिजू 
अनेकदा वक्फ सुधारणा झालीय - रिजिजू
वक्फमध्ये काँग्रेसने २०१३मध्ये केलेल्या सुधारणा घातक - रिजिजू
वक्फ घटनेच्या कलम ५६ अंतर्गत नाही - रिजिजू

वक्फ विधेयकाआडून काँग्रेस खोटे बोलतेय - खासदार श्रीकांत शिंदे

'देशात आठ लाख एकर संपत्ती वक्फ बोर्डाकडे' 
लोकसभेत समोर आली धक्कादायक माहिती

काँग्रेस, सपा, एमआयएमचा विधेयकाला विरोध
'हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील'
मुसलमान खासदाराचा लोकसभेतच इशारा

.................................

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर
कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा विधेयक
विधेयकात प्रस्तावित ४० सुधारणा

काय आहेत प्रस्तावित प्रमुख सुधारणा ?

मालमत्तेची जिल्हा अधिकाऱ्यांकडे नोंदणी
मालमत्तेची पडताळणी
वक्फ बोर्डाच्या कामकाजात सुधारणा
वक्फ बोर्डात महिलांचा समावेश
वक्फ मालमत्तांच्या वादाची सुनावणी जिल्हा अधिकारी करतील

बोहरा आणि आघाखानींसाठी स्वतंत्र औकाफ मंडळ
शिया, सुन्नी, बोहरा, आगाखानी आणि इतर मागासवर्गीय मुसलमानांना वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व


सम्बन्धित सामग्री