Thursday, June 27, 2024 07:57:04 PM

Waddetiwar & Ambedkar will visit to hake& waghmare
वड्डेटीवार आणि आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला जाणार

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दुपारी दोन वाजता भेट देणार आहेत. तर प्रकाश आंबेडकर भेट देणार आहेत.

वड्डेटीवार आणि आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला जाणार

जालना : ओबीसी आरक्षण बचाव उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दुपारी दोन वाजता भेट देणार आहेत. तर प्रकाश आंबेडकर भेट देणार आहेत. वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला येऊन पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत. दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली असल्याने डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा सल्ला दिला आहे.  


सम्बन्धित सामग्री