Wednesday, November 20, 2024 09:07:50 AM

Voting can be done by showing proof of identity
मतदान कार्ड नसल्यास ओळखीचा पुरावा दाखवून करता येणार मतदान

राज्यातील मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान कार्ड नसल्यास ओळखीचा पुरावा दाखवून करता येणार मतदान


मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी आज २० नोव्हेंबर मतदानाचा दिवस आहे. आज मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. मतदानाला जाण्यासाठी नागरिकांनी मतदान कार्ड घेऊन जाणे अपेक्षित असते. परंतु काही कारणास्तव मतदार आपले मतदान कार्ड विसरल्यास ओळखीचा पुरावा (ओळखपत्र) दाखवून त्यांना मतदान करता येणार आहे. 

मतदान कार्ड नसल्यास खालील ओळखीचा पुरावा दाखवून मतदान करता येणार : 

1) आधार कार्ड.

2) मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र. (जॉब कार्ड)

3) बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक

4) श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.

5) वाहन चालक परवाना. (ड्रायव्हिंग लायसन्स)

6) पॅन कार्ड

7) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड.

8) भारतीय पारपत्र. (पासपोर्ट)

9) छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे.

10) केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र.

11) संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र.

12) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo