Thursday, September 05, 2024 12:02:36 PM

Mumbai Metro
डीलीट केले भूमिगत मेट्रोबाबतचे ट्वीट

मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रोबाबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी यांनी हिंदी भाषेत ट्वीट केले होते. हे ट्वीट त्यांनी डीलीट केले.

डीलीट केले भूमिगत मेट्रोबाबतचे ट्वीट

मुंबई : मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रोबाबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी यांनी हिंदी भाषेत ट्वीट केले होते. हे ट्वीट त्यांनी डीलीट केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

भूमिगत मेट्रोचा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीए करत आहे. पण मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही घोषणा केली नसताना तावडेंनी मेट्रोविषयी ट्वीट केले. यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. तावडेंच्या ट्वीटमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी करत होते. हा प्रयत्न सुरू असतानाच विनोद तावडेंनी ट्वीट डीलीट केले. यामुळे ट्वीट करण्याचे आणि ते डीलीट करण्याचे कारण हे दोन्ही प्रश्न अनुत्तरित आहेत. 

काय होते ट्वीट ?

मुंबईतली पहिल्या भूमिगत मेट्रो सेवेचा पहिला टप्पा २४ जुलैपासून सुरू होणार, असे तावडेंनी हिंदीत ट्वीट करुन जाहीर केले होते. हेच ट्वीट त्यांनी आता डीलीट केले आहे.


सम्बन्धित सामग्री