Wednesday, January 15, 2025 10:11:05 AM

Vinesh Phogat
विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादानं फेटाळली

विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. यामुळे भारताची सातव्या पदकाची आशा मावळली आहे.

विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादानं फेटाळली

लॉसने : विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. यामुळे भारताची सातव्या पदकाची आशा मावळली आहे. विनेशचा संघर्ष संपुष्टात आला आहे. विनेशला पदक मिळणार नाही.

एरवी ५३ किलो वजनी गटातून खेळणारी विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो गटातून खेळली. ती अंतिम फेरीसाठी पात्र झाली. पण अंतिम फेरीचा खेळ सुरू होण्याआधी नियमानुसार केलेल्या तपासणीत विनेशचे वजन जास्त असल्याचे लक्षात आले. यामुळे पंचांनी विनेशला बाद केले. यानंतर विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली. सुवर्ण नाही तर निदान रौप्य पदक मिळावे, अशी मागणी विनेशकडून करण्यात आली. पण नियमांचा आधार घेत क्रीडा लवादाने विनेश फोगाटची याचिका फेटाळली. क्रीडा लवादाचा निर्णय आल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी निराशा व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री