Tuesday, September 17, 2024 01:54:22 AM

Vinesh Phogat
अतिरिक्त वजन भोवलं, सोनेरी स्वप्न भंगलं

कुस्तीत पदक जिंकण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला वाढलेल्या वजनामुळे अपात्र जाहीर करण्यात आले. यामुळे विनेश ५० किलो गटात अंतिम फेरीत खेळू शकणार नाही.

अतिरिक्त वजन भोवलं सोनेरी स्वप्न भंगलं

पॅरिस : कुस्तीत पदक जिंकण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला वाढलेल्या वजनामुळे अपात्र जाहीर करण्यात आले. यामुळे विनेश ५० किलो गटात अंतिम फेरीत खेळू शकणार नाही.

विनेशची निवड ५० किलो वजनी गटात झाली होती. या गटातून खेळत कामगिरीच्या जोरावर विनेशने अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अंतिम फेरीआधी केलेल्या वजन तपासणीत विनेशचे वजन वाढल्याचे लक्षात आले. नियमानुसार विनेशला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरोधात भारताकडून दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव केला होता. उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या फोगटचे अंतिम फेरीआधी नियमानुसार वजन तपासण्यात आले. यावेळी वजन वाढल्याचे लक्षात आले आणि विनेशला अपात्र जाहीर करण्यात आले. 

विनेशच्या अपात्रतेवरुन राजकारण

विनेशला अपात्र ठरवण्याच्या मुद्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. कट करुन विनेशला अपात्र ठरवल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांकडून करण्यात आला आहे. लोकसभेत राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला. क्रीडामंत्र्यांनी या विषयावर लोकसभेत उत्तर दिले.

पंतप्रधान मोदींचे ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशचे सांत्वन करणारे ट्वीट केले. देश तुझ्यासोबत आहे, असे मोदी म्हणाले.

विनेश कुठं चुकली ?

  1. विनेश मुळातच ५३ किलो वजनी गटाची स्पर्धक आहे. 
  2. विनेश हट्टाने ५० किलो वजनी गटात उतरली. 
  3. मंगळवारी रात्रभर तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न केले. 
  4. प्रयत्नपूर्वक वजन कमी करण्यात अपयश आलं.
  5. स्पर्धेआधी वजन नियमानुसार भरले नाही.
  6. विनेश स्पर्धेतून बाद झाली आणि तिचे क्रीडा गुणांकन घसरले.
  7. नियमानुसार नेहमीचा वजनी गट राखला असता तर चित्र वेगळे असते.

सम्बन्धित सामग्री