Wednesday, April 16, 2025 09:09:12 PM

'महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार?'

महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा ७१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार

मुंबई : महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या. आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. अस म्हणत त्यांनी सत्ताधारी आणि अदानीचा समाचार घेतला आहे. 

महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ चं अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का? असाही प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे असे म्हणत त्यांनी सरकारला लक्ष केले आहे. 

महाराष्ट्र विक्री आहे!

देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समुहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्योग कमी होते ते आता शाळा देखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार या सरकारने अदानी समूहाकडे दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण सरकारने दिले आहे असा निशाणा सरकारवर वडेट्टीवारांनी साधला आहे.  


 
 


सम्बन्धित सामग्री