Friday, July 05, 2024 07:14:51 PM

Video of Talatha's bullying goes viral
तलाठ्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा जिलह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील तलाठ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तलाठ्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा : बुलढाणा जिलह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील तलाठ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेंतर्गत १९ ते ६० वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला-पुरुष तलाठी कार्यालयात दाखल्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची गर्दी झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी तलाठी साहेब तुम्ही गावात का येत नाही म्हणून जाब विचारला तर  तलाठी काळे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालत अर्ज स्वीकारणे बंद केले. आणि माझी तक्रार कुठेही करा, आमदार खासदारांसह तहसीलदार यांचेकडे तक्रार करा, मी अर्ज घेत नसल्याचे सांगत तलाठी निघून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दादगिरी करणाऱ्या तलाठ्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री