मुंबई : दिवाळीच्या दिवसांत झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे झालेल्या धुरामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता. पहिल्याच दिवशी काही भागात अतिवाईट ते वाईट हवेची नोंद झाली. दिवाळीनंतर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही. सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच नोंदला गेला. सलग पाच दिवस शहरात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यामुळे, अशुद्ध हवेचा मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे.