पुणे : वंचित बहुजन आघाडी पक्षाला पुण्यात मोठी गळती लागली आहे. गुरूवारी वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीवरून राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. दुसरीकडे वंचितचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख गौरव जाधव, निरंजन कांबळे, यांच्यासह काही पदाधिकारी कार्यकर्ते शुक्रवारी राशपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. वंचितच्या शहर कार्यकारिणीवर नाराज असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार असल्याची माहिती आहे.
वसंत मोरे वंचितमधून शिउबाठात जाणार असल्याची चर्चा आहे. मोरेंची पार्श्वभूमी पाहत शिउबाठात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षात होते. लोकसभा निवडणुक जाहीर होताच त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. वंचितकडून पुणे लोकसभेसाठी त्यांना खासदारकीचे तिकिट मिळाले. मात्र मोरे निवडणूक जिंकू शकले नाहीत. आता लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत.