मुंबई : पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना ? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. घटनास्थळाच्या आसपासच्या गावांमध्ये कुठेही कार्यक्रम नव्हता. मग दुर्घटनास्थळी वैभव नाईक १५ मिनिटांत कसे पोहोचले ? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. नाईक यांचे निवासस्थान घटनास्थळापासून किमान ५० किमी. लांब कणकवली शहरात आहे. एवढ्या लांबून वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले ? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला. हे वैभव नाईकने घडवलं असेल तर दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी ठेवावी, असा इशाराही निलेश राणेंनी दिला.