मुंबई : मुंबईमधील २०० बेकरींपैकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. लॉगवूडच्या तुलनेत खूपच कमी खर्च असल्यामुळे जुन्या फर्निचरमधून मिळणारे लाकूड, जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील लाकूड असे भंगार लाकूड (स्क्रैप वूड) हा या बेकरींच्या इंधनाचा प्राथमिक स्रोत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत मोठी भर पडते, असे अभ्यासासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.