Wednesday, April 09, 2025 10:33:31 AM

राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन कोर्टाची मंजुरी

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन कोर्टाची मंजुरी

मुंबई : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झाला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राणाविरोधात भारताने पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

कोण आहे तहव्वूर राणा?

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहव्वूर राणा हा फरार आरोपी आहे. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार एजंट डेव्हिड कोलमन हेडलीचा विश्वासू सहकारी आहे. पाकिस्तानातील पंजाबमधील चिचावतनी येथे जन्मलेला राणा हा व्यवसायाने डॉक्टर होता. पाकिस्तान आर्मी मेडिकलमध्ये कॅप्टन जनरल ड्युटी प्रॅक्टिशनर म्हणून काम केले होते. 63 वर्षीय राणा निवृत्तीनंतर तो 1997 मध्ये कॅनडाला गेला. तेथे त्याने इमिग्रेशन सेवा व्यवसाय सुरू केला. त्याची कार्यालये शिकागो, न्यूयॉर्क आणि टोरंटो येथे होती. त्याचे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या आयएसआयशी थेट संबंध होते. डॅनिश वृत्तपत्रावर हल्ल्याची योजना आखताना अमेरिकन अधिकाऱ्यांनी राणाला पकडले. त्या प्रकरणात राणाला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, 2020 मध्ये त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते. न्यायालायने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : कोणत्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही?

 

भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली. 26/11 हल्ल्यात अंदाजे 160हून अधिक नागिरकांचा मृत्यू झाला. अन्य गुन्ह्यात राणा अमेरिकेत अटकेत होता. राणाची विनंती फेटाळल्यामुळे आता प्रत्यार्पण होणार आहे.


सम्बन्धित सामग्री