Friday, July 05, 2024 12:16:41 AM

Hathras Stampede
हाथरसमधील चेंगराचेंगरीत १३४ मृत्यू

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

हाथरसमधील चेंगराचेंगरीत १३४ मृत्यू

हाथरस : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोले बाबा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश सरकारचे तीन मंत्री तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातलगांना दोन - दोन लाखांची तर जखमींना ५० - ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही मृतांच्या नातलगांना दोन - दोन लाखांची तर जखमींना ५० - ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.


सम्बन्धित सामग्री