मुंबई : निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनवर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. महाविकास आघाडीकडून नेहमीच ईव्हीएम मशीनवर आरोप केले जातात. त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएम विरोधात केलेले अनोखे आंदोलन चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएमविरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ईव्हीएम होडीतून घेऊन गेले आणि त्यानंतर ते ईव्हीएम मशीन समद्रात बुडवले आहे . या आंदोनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कसं केलं आंदोलन?
शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत आंदोलन केलं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन केलं. ईव्हीएम विसर्जित केले नाही, तर लोकशाही विसर्जित होईल. प्रगत देशात ईव्हीएम नाही मग भारतात का? ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, असं म्हणत ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.
दरम्यान महाविकास आघाडीकडून नेहमीच ईव्हीएम मशीनवर आरोप केले जातात. त्यातच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएमविरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ईव्हीएम होडीतून घेऊन गेले आणि त्यानंतर ते ईव्हीएम मशीन समद्रात बुडवलेआहे . या आंदोनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.