Thursday, November 21, 2024 12:27:50 PM

Maharashtra Election 2024
राज्यात अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट

मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.

राज्यात अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट

मुंबई : मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले. बीडमध्ये ईव्हीएमची तोडफोड झाली तर सायन, साताऱ्यासह बारामतीमध्ये राड्याच्या घटना घडल्या.  नांदगाव - मनमाड रस्त्यावर शिवसेना उमेदवार सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी अडवले. या घटनेवरुन दोन्ही गटांमध्ये राडा झाला. कांदेंनी 'मर्डर फिक्स्ड' अशी धमकी देण्यास सुरुवात केली. यातून तणाव वाढला. बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाला तर साताऱ्यात मतदान करताना मतदाराने अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमध्ये लाटकर आणि क्षीरसागर गटाचे कार्यकर्ते भिडले. 

राज्यात 58 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले. तर झारखंडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 67.59 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 69.63 टक्के  आणि मुंबई शहर जिल्ह्यात सर्वात कमी 49.07 टक्के मतदान झाले. गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजीने मतदान केले. उद्योगपती मुकेश अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह मनोरंजन, क्रीडा, फॅशन विश्वातील अनेक दिग्गजांनी, सेलिब्रेटींनी मतदान केले. राजकारणी उत्साहाने सहकुटुंब मतदानासाठी आले होते. 

महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

अहमदनगर - 61.95
अकोला - 56.16
अमरावती - 58.48
औरंगाबाद - 60.83
बीड - 60.62
भंडारा - 65.88
बुलढाणा - 65.84
चंद्रपूर - 64.48
धुळे - 59.75
गडचिरोली - 69.63
हिंगोली - 65.09
जळगाव - 61.18
जालना - 64.17
कोल्हापूर - 67.97
लातूर - 61.43
मुंबई शहर - 49.07
मुंबई उपनगर - 51.76
नागपूर - 56.06
नांदेड - 55.88
नंदुरबार - 63.72
नाशिक - 59.85
उस्मानाबाद - 58.59
पालघर - 59.31
परभणी - 62.73
पुणे - 54.09
रायगड - 61.01
रत्नागिरी - 60.35
सांगली - 63.28
सातारा - 64.16
सिंधुदुर्ग - 62.06
सोलापूर - 57.09
ठाणे - 49.76
वर्धा - 63.50
वाशिम - 57.42
यवतमाळ - 61.22


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo