Thursday, June 27, 2024 08:31:21 PM

Ujjwal Nikam
निकम पुन्हा विशेष सरकारी वकील

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

निकम पुन्हा विशेष सरकारी वकील

मुंबई : कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधी राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खटले उज्ज्वल निकम लढवत होते. ते विशेष सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. पण भाजपाने निकमांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही उमेदवारी स्वीकारण्याआधी निकमांनी सर्व सरकारी खटले लढवणे थांबवले होते. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर निकमांनी पुन्हा एकदा राजकारण सोडून वकिली करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य शासनाने अनेक महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज पुन्हा उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. आता सरकारचा वकील पण भाजपाचा असणार का ?, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. 

निकम पुन्हा विशेष सरकारी वकील 
लोकसभा निवडणुकीसाठी दिला होता राजीनामा 
सर्व खटले उज्ज्वल निकम यांच्याकडे सुपूर्द 
 


सम्बन्धित सामग्री