Monday, July 01, 2024 01:15:20 AM

Uddhav Thackeray Chief ministerial candidate
उद्धव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ?

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव यांचे नाव सुचवले आहे.

उद्धव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव यांचे नाव सुचवले आहे. राऊतांनी अप्रत्यक्षपणे उद्धव यांचे नाव सुचवले तरी काँग्रेसने या विषयावर सूचक मौन बाळगले आहे. यामुळे मविआत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. महाविकास आघाडीला जे यश मिळाले ते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे. त्यांचा चेहरा पाहूनच मविआला जास्त मतदान झाले आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले आहे. 

महायुतीची भूमिका 

विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार याबाबतचे मविआचे सूत्रच ठरलेले नाही. यामुळे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार एवढ्यात ठरणे कठीण आहे. काँग्रेस उद्धव यांच्या नेतृत्वात काम करायला तयार होण्याची शक्यता आता वाटत नाही. यामुळे राऊत काहीही सुचवत असले तरी उद्धव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होण्याची शक्यता सध्या वाटत नाही. 

  1. मविआ पुन्हा उद्धवना मुख्यमंत्री करणार ?
  2. राऊतांची मागणी पटोले, पवार मान्य करतील ?
  3. योग्य वेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार - उद्धव 

सम्बन्धित सामग्री