Friday, September 13, 2024 01:47:34 PM

Uddhav
उद्धव यांचा एकच हट्ट

मुख्यमंत्री या पदाचा मोह नाही असे सांगणाऱ्या उद्धव यांनी काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा धोश लावला आहे.

उद्धव यांचा एकच हट्ट

मुंबई : मुख्यमंत्री या पदाचा मोह नाही असे सांगणाऱ्या उद्धव यांनी काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा धोश लावला आहे. विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढली जाणार हे जाहीर करा, अशी मागणी उद्धव यांनी काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे केली आहे. 

एकेकाळी मातोश्री बंगल्यात युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब व्हायचे. भाजपाचे राज्यातले आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते मातोश्री बंगल्यावर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घ्यायचे. पण उद्धव मविआत गेले आणि परिस्थिती बदलली आहे. उद्धव यांना दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घ्यावी लागते. बैठकीत त्यांना काँग्रेसचे उपरणे वापरावे लागते. मुख्यमंत्रिपदाचा नेता जाहीर करणाऱ्या मातोश्री बंगल्याला आता सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या निर्णयाची वाट बघावी लागते. 

युती असताना ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र होते. मविआची स्थापना झाली त्यावेळी याच सूत्राआधारे उद्धव सुमारे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले होते. पण आमदारांचा पाठिंबा गमावल्यामुळे उद्धव यांच्या सरकारला पायउतार व्हावे लागले होते. आता २०२४ ची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा नेता जाहीर करावा, अशी मागणी उद्धव यांनी सुरू केली आहे. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र यावेळी स्वीकारू नये अशी भूमिका शिउबाठाने घेतली आहे. 


सम्बन्धित सामग्री