Wednesday, September 18, 2024 07:42:27 AM

Malvan
मालवण पुतळा प्रकरणी उद्धव समर्थक अडचणीत ?

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी नवी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मालवण पुतळा प्रकरणी उद्धव समर्थक अडचणीत

मुंबई : मालवण येथे राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याप्रकरणी राजकीय वाद निर्माण झाला.  वादाची तीव्रता वाढत असतानाच मालवण पुतळा प्रकरणी नवी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिउबाठा समर्थक बाबा सावंतकडे सुशोभीकरणाचे काम होते, अशी माहिती पुढे येत आहे. बाबा सावंतचे उद्धव समर्थकांसोबत फोटो समोर आले आहेत. 

शिउबाठाच्या वैभव नाईक यांनी बाबा सावंत आमचा कार्यकर्ता आहे अशी कबुली दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी शरद पवार, उद्धव आणि आदित्य यांना सुनावले आहे. दुर्दैवी घटनेचे भांडवल करणाऱ्या उद्धव आणि आदित्य तसेच शरद पवार गटाने तोंड काळे करावे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

नेमके काय घडले ?

नौदल दिनाचे औचित्य साधून ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या पुतळ्यावरुन राजकीय वादाला तोंड फुटले. या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पुतळाप्रश्नी चर्चा सुरू असतानाच शिउबाठा समर्थक बाबा सावंतकडे सुशोभीकरणाचे काम होते, अशी माहिती पुढे आली आहे. 


सम्बन्धित सामग्री