Friday, September 06, 2024 08:19:05 AM

Tulsi Lake
तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मागच्या वर्षी २० जुलै रोजी मध्यरात्री १.२८ वाजता आणि यंदा २० जुलैलाच सकाळी ८.३० वाजता तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. 

तुळशी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी आहे. या तलावातून दररोज मुंबईला १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. 

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर तुळशी तलाव आहे. या तलावाचे बांधकाम १८७९ मध्ये पूर्ण झाले. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा सर्वात लहान तलाव आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सर्वात आधी तुळशी तलाव भरतो. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि त्यांची पाणी साठवण्याची क्षमता

मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा - ३८०० दशलक्ष लिटर

  1. भातसा - ७,१७,०३७ दशलक्ष लिटर - २,७२,५३३ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  2. अप्पर वैतरणा - २,२७,०४७ दशलक्ष लिटर - १९,८६३ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  3. मध्य वैतरणा - १,९३,५३० दशलक्ष लिटर - ६९,९४० दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  4. मोडकसागर - १२८९२५ दशलक्ष लिटर - ७४,३३५ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  5. तानसा - १,४५,०८० दशलक्ष लिटर - १,०७,३६७ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  6. विहार - २७,६९८ दशलक्ष लिटर - १६,३५५ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  7. तुळशी - ८,०४६ दशलक्ष लिटर - पूर्ण भरला

सम्बन्धित सामग्री