Wednesday, September 18, 2024 02:23:36 AM

Nashik
नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ

आदिवासींसाठी नाशिकमध्ये विद्यापीठ सुरू करणार. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी आणि २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ

नाशिक : आदिवासींसाठी नाशिकमध्ये विद्यापीठ सुरू करणार. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी आणि २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यावर राज्यपालांनी विद्यापीठाची घोषणा केली. 

आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील; असेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असेही राज्यपालांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री