Saturday, October 05, 2024 11:13:07 PM

chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक, ३१ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडाच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले.

छत्तीसगडमध्ये चकमक ३१ नक्षलवादी ठार

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडाच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये १८ पुरुष आणि १३ महिला नक्षलवादी आहेत. ही अलिकडच्या काळातील नक्षलवाद्यांविरुद्धची सर्वात मोठी कारवाई आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात एलएमजी रायफल, एके ४७ रायफल, एसएलआर रायफल, इन्सास रायफल, .३०३ कॅलिबर रायफल आहे. सुरक्षा पथकांनी आठ महिन्यात १५० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना ठार केले. 

दंतेवाडाच्या जंगलातील चकमकीत ठार झालेल्या नक्षवाद्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. चकमक जंगलाच्या मोठ्या भागात झाली. पळत असलेल्या नक्षलवाद्यांचा पाठलाग करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कारवाई संपल्यानंतर सुरक्षा पथकाने जंगलात शोध मोहीम हाती घेऊन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा पथकाने नारायणपूरच्या मुख्यालयात पाठवले आहेत.


सम्बन्धित सामग्री