Friday, November 22, 2024 03:22:16 PM

Tomato prices increased
टोमॅटो दर वाढले

राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत.

टोमॅटो दर वाढले
Tomato


नवी मुंबई : राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर वाढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १३७ टन टोमॅटोची आवक झाली. मागणीच्या तुलनेमध्ये ५० ते ६० टन आवक कमी होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. एक आठवड्यापूर्वी टोमॅटोला ३० ते ४० रुपये दर मिळत होता. आता होलसेल मार्केटमध्ये दर ४० ते ४५ रुपयांवर पोहोचला आहे. टोमॅटो खराब होण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही टोमॅटोचे दर वाढत आहेत. नवी मुंबई, मुंबई परिसरात ६० ते ९० रुपये दराने विक्री होत आहे. लवकरच दरवाढीचे शतक पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत पुणे, सातारा परिसरातून आवक होत आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo