राज्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. याच पार्शवभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता आता अपघात टाळण्यासाठी ए. आय. चा वापर करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथी गृहावर घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलीय.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षांत नवीन ई. व्ही. पॉलिसी घोषित करावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला आहे. घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनीयरिंग सोल्यूशन शोधून काढावे.
त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील घाट रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर विशेष लक्ष देण्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, "घाट मार्गांवर अपघातांची संख्या खूप वाढली आहे. यासाठी इंजिनीयरिंग सोल्यूशन्स शोधून रस्त्यांवरील सुरक्षा सुधारण्यात यावी." यामुळे घाट मार्गांवर होणारे अपघात कमी होण्याची आशा आहे.ए. आय. चा वापर म्हणजे रस्त्यावर असलेल्या प्रत्येक वाहनाचे निरीक्षण, आणि अपघाताची संभाव्यता ओळखून त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करणे होईल. यामुळे रस्ते अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. गुगलसोबतचा करार रस्ते सुरक्षा आणि वाहनांच्या निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ही राज्यात वाहतूक सुरक्षा सुधारण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल ठरते. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विविध तंत्रज्ञानांचा वापर करून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यभरातील नागरिक आणि वाहतूक विभागाने या योजनांची योग्य अंमलबजावणी केली, तर राज्यातील रस्ते अधिक सुरक्षित होऊ शकतात, आणि अपघातांच्या संख्येत घट होऊ शकते.