Monday, September 09, 2024 03:12:39 PM

Train Accidents
देशात सहा आठवड्यात तीन रेल्वे अपघात

देशात सहा आठवड्यात तीन मोठे रेल्वे अपघात झाले. या तीन रेल्वे अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला

देशात सहा आठवड्यात तीन रेल्वे अपघात

नवी दिल्ली : देशात सहा आठवड्यात तीन मोठे रेल्वे अपघात झाले. या तीन रेल्वे अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आणि १०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. 

कंचनजंगा एक्सप्रेस १७ जून २०२४ रोजी रुळांवरुन घसरली. सिग्नल तोडून पुढे आलेल्या मालगाडीची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आणि ६० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. न्यू जलपायगुडी येथे हा अपघात झाला. यानंतर १८ जुलै २०२४ रोजी गोंडा येथे अज्ञातांनी रुळ तोडल्यामुळे चंदिगड - दिब्रुगड गाडीचे आठ डबे रुळावरुन घसरले. यानंतर ३० जुलै २०२४ रोजी हावडा - मुंबई मेल आणि मालगाडी यांची टक्कर झाली. 

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तरतूद

अर्थसंकल्प २०२४ - २५ मध्ये रेल्वे मंत्रालयासाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २००० - २००१ मध्ये देशात ४७३ रेल्वे अपघात झाले. तर २०१४ - २०१५ मध्ये १३५ रेल्वे अपघात झाले. रेल्वे अपघातांमध्ये २०२२ मध्ये लक्षणीय घट झाली. अपघातांची संख्या ४८ वर आली. रेल्वे मंत्रालयाने सर्व गाड्यांमध्ये कवच नावाची यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे टक्कर होण्याचा धोका ओळखून गाडी आपोआप थांबेल. यामुळे जीवितहानी टाळण्यास मदत होईल; असा विश्वास रेल्वे प्रशासन व्यक्त करत आहे. कवच प्रणालीचा पहिला यशस्वी प्रयोग २०१६ मध्ये करण्यात आला. पण अद्याप ही यंत्रणा देशातील सर्व गाड्यांमध्ये बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 


सम्बन्धित सामग्री