मुंबई : मुंबईत नऊ महिन्यात तीन राजकीय हत्या झाल्या. पहिली घटना ९ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली. फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा उर्फ 'मॉरिस भाई' याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली. राजकीय महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेली स्पर्धा या गुन्ह्यासाठी कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले होते. यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती. सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या दोन घटनांनंतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. छातीत गोळी लागून झालेल्या अतिरक्तस्रावाने बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अल्पावधीत ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील वादातून झाली आणि ही हत्या बिश्नोई टोळीने केली असा संशय व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दया नायक यांच्या नेतृत्वात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू आहे.
मुंबईत नऊ महिन्यात तीन राजकीय हत्या
- शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करुन मॉरिस नोरोन्हाने केली हत्या, राजकीय महत्त्वाकांक्षेतून हत्या - ९ फेब्रुवारी २०२४
- भायखळ्यातील म्हाडा कॉलनीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची धारदार शस्त्राने हत्या - ४ ऑक्टोबर २०२४
- वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील वादातून बिश्नोई टोळीने हत्या केल्याचा संशय - १२ ऑक्टोबर २०२४
बाबा सिद्दीकी प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले. एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा. मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दया नायक यांच्या नेतृत्वात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू.
...........
कशी झाली बाबा सिद्दीकींची हत्या ? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
- बाबा सिद्दीकी आणि झिशान शनिवारी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रा येथील खेरवाडीच्या कार्यालयात होते
- रात्री नऊच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी एकत्र निघाले
- झिशान फोन आल्यामुळे कार्यालयातून परस्पर कामासाठी दुसरीकडे गेला
- साधारण पाच मिनिटांनी बाबा सिद्दीकी कार्यालयाबाहेर पडले
- कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या वाहनात बसले
- फटाक्यातला बॉम्ब फुटला, धूर झाला आणि त्याचवेळी गोळीबार झाला
- कोणाला लक्षात येण्याआधीच बाबा सिद्दीकींच्या छातीत एक गोळी लागली
- गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकींचा अतिरक्तस्रावाने मृत्यू
- पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यप आणि हरियाणातील करनाल सिंग उर्फ गुरमेल सिंगला अटक केले
- बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर मुंबईत कूपर रुग्णालयात शवविच्छेदन
- मरिन लाईन्सच्या कब्रस्तानमध्ये रविवारी बाबा सिद्दीकींवर होणार अंत्यसंस्कार