मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला नोएडातून पोलिसांनी अटक केली आहे. झिशान सिद्दीकींच्या कार्यालयात फोन करून त्यांना धमकी देण्यात आली. याआधी काही दिवसांपूर्वी झिशान आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी या दोघांनाही धमकी आली होती. यानंतर काही दिवसांनी झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. हा तपास सुरू असतानाच झिशान सिद्दीकींना धमकी आली होती.