अकाटू : कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ विमान क्रॅश झाले. त्यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. विमानात 75 प्रवासी असल्याची माहिती आहे. अझरबैजानहून रशियाला जाणारं विमान कोसळलं आहे.
हेही वाचा : नाताळनिमित्त वसईतील चर्च आणि परिसर सजली
विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगची सूचना केली. विमान क्रॅश झाल्याने मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. मात्र विमानाचं पुढे काय झालं हे अद्याप कळू शकले नाही. नाताळाच्या दिवशी हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं. 60 हून अधिक जणांचा मृत्यू झालयाची भीती व्यक्त होत आहे. अझरबैजाहून रशियाला जाणारं विमान कोसळलं. कझाकिस्तानमध्ये 72 जणांना घेऊन जाणारं विमान कोसळलं. विमान अपघाताच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. रशियाला जाणारे एक प्रवासी विमान कझाकस्तानच्या अकताऊ क्षेत्राजवळ 72 जणांना घेऊन कोसळले. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान रशियाच्या चेचन्यामधील बाकूहून ग्रोझनीला जात होते.