Sunday, June 30, 2024 08:52:13 AM

The huts in Powai are finally demolished
पवईतील झोपड्या अखेर जमीनदोस्त

पवईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या वेळी रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीनंतर तगड्या पोलिस फौजफाट्यासह सर्व बांधकामे शुक्रवारी हटवण्यात आली.


पवईतील झोपड्या अखेर जमीनदोस्त

 

मुंबई : पवईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या वेळी रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीनंतर तगड्या पोलिस फौजफाट्यासह सर्व बांधकामे शुक्रवारी हटवण्यात आली. जवळपास १२ हजार चौरस फुटांवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईच्या वेळी १५० पोलिस तैनात करण्यात आले होते, तर २५ अधिकारी आणि ३०० कामगार उपस्थित होते

पवईतील वईगाव आणि मौजे तिरंदाज येथील भूखंडावर सुमारे ५०० झोपड्या असलेली 'लेबर हटमेंट' तात्पुरत्या स्वरूपात उभारली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने महापालिकेस दिले होते. या झोपडीधारकांना जूनला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. गुरुवारी पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता तेथील रहिवाशांनी दगडफेक केली. त्यात महापालिकेचे पाच अभियंते, पाच मजूर आणि १५ पोलिसही जखमी झाले आहेत.

              

सम्बन्धित सामग्री