मुंबई : मुंबईतील गोवंडीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात चक्क सफाई कामगार रूग्णाची तपासणी करत असल्याचे समोर आले आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे. हा सफाई कर्मचारी रुग्णांचे ईसीजी (ECG) करत आहेत.
हेही वाचा : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज
समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला आहे. शताब्दी रुग्णालयात रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे आणि त्यावरच उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याविषयी जाब विचारला पण डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता आहे. तसेच या सफाई कर्मचाऱ्यांना याच प्रशिक्षण दिलं आहे आणि ते गेले काही दिवस हे काम करत असल्याचे सांगितले. यातील दोषींवर कारवाही करण्याची मागणी रुकसाना सिद्दिकी यांनी केली आहे. तर यावर पोलिसात अर्ज देऊन दोषींच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे सांगितले.