मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा सभा होणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात दोन अशा एकूण दहा प्रचारसभा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. लवकरच त्यांच्या दौऱ्याला अंतिम स्वरूप मिळेल, अशी माहिती भाजपाच्या सुत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट या अन्य दोन घटक पक्षांनीही केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा १४ नोव्हेंबरनंतर परदेश दौरा असल्याने त्यापूर्वी त्यांच्या प्रचारसभा राज्यात करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे.