पुणे : पुण्याजवळील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले. तटकरेंना घ्यायला निघालेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे एक हेलिकॉप्टर पडल्याची घटना घडली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून चार वाहने रवाना झाले होते . काही जण मृत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी शासकीय रुग्णवाहिका १०८ दाखल झाल्या. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. धुक्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे.